अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- केडगाव येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या पन्नास वर्षीय अनोळखी पुरुषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दि. 15) घडली. नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील पंचम वाईन दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला.
त्यास पंचम वाईनचे मालक प्रदीप पठारे यांनी उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी तसेच पोलिस नाईक तरटे यांनी दिलेल्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अधिक तपास पोलिस नाईक बाबासाहेब इखे करीत आहे. ओळख अद्याप पटली नाही : मृत व्यक्तीचा वर्ण सावळा, शरीरबांधा सडपातळ, उंची 164 से.मी., नाक-सरळ, केस काळे-पांढरे, अंगात फुल बाह्याचा पिवळा शर्ट व काळया रंगाची नाईट पँट घातलेली आहे.
या वर्णनाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असेल अगर त्याच्या नातेवाईकांना ओळखत असेल, त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन 0241-2416117 वा पोलिस नाईक इखे मो.9923600605 या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम