अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- वय वर्षे ७५, कोरोना एच आरसीटी स्कोअर १९, ऑक्सिजन पातळी ८० असलेली वृद्ध महिला, स्कोअर १५, तर ऑक्सिजन पातळी ८२ असलेला पुरुष रुग्ण, स्कोअर १५,
ऑक्सिजन पातळी ८१ च्या आसपास असलेले वृद्ध यांनी श्रीरामपूर शहरातील पसायदान कोविड केंद्रात उपचार घेऊन कोरोनावर मात केली.
या सर्वांना सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्यात आला. साखरबाई पुजारी, वय ७५, यांचा स्कोअर १९, ऑक्सिजन पातळी ८०, सोमनाथ नागरे, वय ६० यांचा १५, तर ऑक्सिजन पातळी ८२, नेहाबाई, वय ६० स्कोअर, १५ ऑक्सिजन पातळी ८१ च्या आसपास होता.
रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा तरीही आहे त्या उपलब्ध औषधांचा वापर करून केंद्राचे डॉ. रवींद्र कुटे, डॉ. मयुरेश कुटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मृण्मयी कुटे, डॉ. सूरज गोरे, डॉ. शिवदास पवार,
डॉ. नरेंद्र हिंगणे, नलिनी कुटे, परिचारिका शोभा, दीक्षा, विद्या मुन्तोडे व प्रितेश मुन्तोडे आणि किशोर धिवर आदींनी वैद्यकीय कौशल्याचा वापर करून या सर्वांना सात दिवसांत बरे करून कोरोनावर विजय मिळवला.
ते ठणठणीत बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा देत सन्मानपूर्वक घरी सोडण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम