सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांची मोठी घोषणा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी गृहमंत्री अमित शाह यांची संसदेतील शाह यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.

यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. आदर पुनावाला आणि अमित शाह यांच्यात कोरोना लस निर्मिती आणि पुरवठा यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

कोवोवॅक्स या लसीबद्दल माहिती देताना त्यांनी ही लस भारतात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार असल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

तसेच सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले आहेत. पूनावाला यांनी गृहमंत्री अमित शहा यांची संसदेत भेट घेतली. त्या दोघांमध्ये 30 मिनिटे बैठक झाली.

तसेचं अदर पूनावाला यांनी म्हटले की, सरकार आम्हाला पाठिंबा देतंय. कसल्याही प्रकारची आर्थिक अडचण नाही. मी पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.

मोठ्यांसाठी कोवोवॅक्स ही लस ऑक्टोबरपर्यंत येईल, अशी मला आशा आहे. आम्ही नेहमीच लस उत्पादक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात राहिलो आहोत.

ते पुढे म्हणाले, कोवोवॅक्स ही दोन डोसची लस आहे. जेव्हा कोवोवॅक्स लाँच होईल तेव्हाच त्याची किंमत देखील लोकांना समजले. लहान मुलांसाठीची लस मार्च 2022 पर्यंत उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe