अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-संगमनेर हे अवैध धंद्यांचे केंद्रस्थान बानू लागले आहे. तालुक्यात काही दिवसांपूर्वी गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.
यातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात गोमांस तस्करी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असून संगमनेरात मात्र खुलेआम गायींची कत्तल सुरू आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/04/cows-in-ahmadabad-696x447-1.jpg)
यातच संगमनेर शहरातील जमजम कॉलनी भागात सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून सात लाख रुपये किमतीचे तब्बल साडेतीन हजार किलो गोमांस जप्त केले.
या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी अनेक कारवाया केल्या तरीदेखील हे कत्तलखाने बंद होत नाहीत. याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील करण्यात आली आहे.
त्यावरून पूर्वी दोन छापे पोलिसांनी टाकले होते परंतु आता पुन्हा जमजम कॉलनी येथे मोठा वाडा परिसरात बेकायदेशीर कत्तलखान्यामध्ये जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
म्हणून पोलिसांनी छापा टाकून या कत्तलखान्या मधील तब्बल साडेतीन हजार किलो गोमांस व जिवंत जनावरे जप्त केले या मुद्दे मालाची किंमत एकूण सात लाख रुपये इतकी आहे पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|