मिठाईच्या दुकानात घुसलेल्या ट्रकने घेतला सात जणांचा जीव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- एका मिठाईच्या दुकानात घुसलेल्या ट्रकने अनेक लोकांना धडक दिली.यात 7 जणांचा जागीच मृत्यू तर 12 पेक्षा जास्त जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

ही दुर्घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यात घडली. तेल्हाडामधून सर्व मृतदेह शरीफ सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघात आणि 7 जणांच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाने ट्रकला पेटवले. लोकांना शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक करण्यात आली.

संतप्त जमावाने तेल्हाडा पोलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांनाही पेटवून दिले. या दुर्घटनेबाबत नालंदाचे खासदार कौशलेंद्र कुमार यांनी दुःख व्यक्त केले आहे.मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या आदेशानुसार मृतांच्या कुटूंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी 44 लाखाचा धनादेश सूपुर्द केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe