शाहरुख खानला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख सत्तार खान (वय २१ रा. जालना ह.रा. गजानन काॅलनी, नवनागपूर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवनागापूर परिसरात अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर मोतीराम दुकळे यांना मनमाड रोडवर पंक्चर काढीत असताना आरोपी नामे किरण अर्जुन आजबे, शाहरुख खान व इतर साथीदार यांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते.

ही घटना कोल्हार बुद्रुक शिवारात घडली होती. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्हयाचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय खबर मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी शाहरुख खान नवनागापूर परिसरात आहे. पोलीस पथकाने तात्काळ शाहरुख खान याला नवनागापूर परिसरातून अटक केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe