हमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जिल्हयात भाजपाला जोरदार धक्का बसला असला आहे. माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे समर्थक तथा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरिकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यामुळे कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात भाजपात एकच खळबळ माजली आहे. ढोकरिकर यांनी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कौटुंबिक जबाबदारी व आजारपणामुळे जिल्ह्यात प्रवास करणे जमणार नाही त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत आहे.
प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे व सर्व लोकप्रतिनिधी यांनी आपल्याला जे सहकार्य केले त्यामुळे मी ऋणी राहील. तसेच आपण भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणून कायम राहील असेही म्हटले आहे. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी देखील दिला होता आता
दुसऱ्या जिल्हास्तरीय नेत्याने राजीनामा दिल्याने कर्जत सह जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, माजी मंत्री प्रा. राम शिंदे राज्यातील नेत्यांसह दिल्ली दौऱ्यावर असताना हा निर्णय घेतला गेल्याने याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
भाजपाचा हा धुरंधर गेली काही दिवसापासून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होते.त्यामुळेढोकरिकरानी आपल्या राजकीय वाटचालीचे संकेत अनेकदा यापूर्वीच दिले होते, त्यामुळे हा राजीनामा म्हणजे त्याच्या सध्याच्या मार्गावरील मोठे वळण समजले जात असून त्याच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम