अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-लग्न झाल्यानंतर सासरी जाणारी सून सासऱ्याला वडिलांच्या जागी तर सासूला आई मानते. मात्र जिल्ह्यातील कोपरगावात नात्याला काळिमा फासणारी एका धक्कादायक घटना घडली आहे.
चक्क सासऱ्याने आपल्या सुनेवर अत्याचार केल्याची लज्जास्पद कृती केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित २१ वर्षीय महिलेचे कोपरगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. मात्र, काही दिवसांनी सासऱ्याची आपल्या सुनेवर वाईट नजर पडली.
काहीनाकाही कारणाने सासरा आपल्या सुनेशी जवळीक करू लागला तसेच तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. ऑगस्ट २०१८ मध्ये एके दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास सून घरात एकटीच असल्याचे पाहून सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला.
कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली. सुनेने त्याच रात्री आपल्या पतीला व सासूला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्या दोघांनीही सुनेचे काहीच ऐकले नाही.
त्यानंतर सासऱ्याने त्याच महिन्यात पुन्हा सून घरात एकटी असताना तिच्यावर दोनदा अत्याचार केला. ही बाब पिडीत महिलेने तिच्या पतीला सांगितले.
मात्र आपला पतीही आपल्याला साथ देत नसल्याने हताश झालेल्या पिडीतेने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना देखील सांगितला नाही.
अखेर अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६ ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सासरा फरार आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|