अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गॉल ब्लॅडरवरील शस्त्रक्रियेनंतरच्या फॉलोअप प्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
शरद पवार नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांच्यावर १२ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ३० मार्च रोजी त्यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१२ एप्रिल रोजी त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांना फॉलोअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांची प्रकृती आता सुधारत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|