शरद पवार झाले सक्रिय : कोरोना संकटाच्या काळात…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-राज्यात सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढण्यात आलेला आहे. यामुळे उद्योग जगतवार याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या शरद पवारांसमोर मांडल्या होत्या,

या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती, शरद पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला.

त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापुर्वी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News