बुलाती है मगर जाने का नही….तरूणी, तिचा कथित पती,साथीदार आणि एक बागायतदार !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  व्यापारी, व्यावसायिक, सरकारी अधिकारी, बागायतदार यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बदनामीची भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. असे हनी ट्रॅप लावून लुटमार करण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात वाढले आहेत. नगर तालुका, अकोले, संगमनेरनंतर आता पुन्हा नगर शहरात असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून दोन लाख उकळविणारी टोळी नगरमध्ये पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. तरुणीसह तिघांविरोधात याप्रकरणी नगरच्या एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तरूणी, तिचा कथित पती,साथीदार आणि एक बागायतदार

पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे येथील शेतकऱ्याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून नगरजवळील वडगाव गुप्ता येथील तरुणी, तरुण आणि राघोहिवरेमधील पंटर अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागायतदाराला अडकविल्याचे उघडकीस

वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या एका तरूणीने अन्य दोघांच्या साथीने पाथर्डी तालुक्यातील एका बागायतदाराला अडकविल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बागायतदाराने या टोळीला दोन लाख रुपये दिले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपी हाती लागलेले नाहीत…

पोलिसांनी या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, आरोपी हाती लागलेले नाहीत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा कथित पती व पाथर्डी तालुक्यातील एक साथीदार यांचा समावेश आहे. तिघेही सध्या पसार असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली

तरूणीने त्या बागायतदाराशी मैत्री करून त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली. या बागायतदाराने ट्रॅपवाल्या टोळीला चेकने पैसे दिले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नगरमधील हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे.

असे अडकविले जाळ्यात…

तरूणीने त्या बागायतदाराला फोन करून त्याच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून तिने त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले.

तरूणीचा पती आला आणि…

१५ जूनला सायंकाळी बागायतदाराला घरी बोलून घेतले. ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा पती आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

गुन्हा दाखल करण्याची धमकी 

खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसऱ्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटरला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांसमोर कथन करत फिर्याद दिली.

अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत

नगर जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. पूर्वी दबक्या आवाजात अशा प्रकारांची चर्चा होत असे. मात्र, काही महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील जखणगाव येथील घटनेचा गुन्हा दाखल झाला. तेथेही एका बागायतदाराची आणि नंतर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे उघड झाले होते.

महिला आणि साथिदांराच्या बोलण्याला फसून सापळ्यात 

प्रथम बागायतदाराने आणि नंतर अधिकाऱ्याने फिर्याद दिली. तेथे किराणा दुकान चालविणारी महिला आणि तिचा साथिदार पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्यानंतर अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात अशा घटना घडल्या. या घटनांची चर्चा होत आहे, त्यांच्या बातम्या प्रकाशित होत आहेत, तरीही लोक संबंधित महिला आणि साथिदांराच्या बोलण्याला फसून सापळ्यात अकडत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe