राम मंदिर उभारणीसाठी सुरू केलेली ‘ती’ मोहीम बंद!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  आयोध्या येथे भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातून राम मंदिरासाठी जनतेकडून देणगी स्वीकारल्या जात होत्या. पण, त्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली. ते म्हणाले, घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली असून जर लोकांना देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने द्यावी. ट्रस्टच्या वेबसाईटवर त्यासाठी ते जाऊ शकतात.

मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

पण राम मंदिराची उभारणी येत्या ३ वर्षांमध्ये पूर्ण होईल. दरम्यान  आतापर्यंत सुमारे  अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe