अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- सोशल मीडियावर वर्चस्व गाजविण्याच्या स्पर्धेत कंटेंट निर्माते आजकाल त्यांच्या अकाउंट्सवर काहीही शेअर करत आहेत.
लाइक्स, कमेंट्स, व्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात लोक वादग्रस्त सामग्री पोस्ट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. तथापि, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्वतःची मर्यादा असते आणि त्याद्वारे बनविलेले नियम मोडल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.
नुकताच मेक्सिकोमधील प्रसिद्ध यु ट्यूबर ला कंट्रोवर्शियल व्हिडिओने तुरूंगात पोहोचवलं आहे.
या व्हिडिओमुळे चर्चेत YouTuber:- मेक्सिकोच्या प्रसिद्ध यू ट्यूबर योस हॉफमॅनचे योसस्टोप नावाचे एक यूट्यूब चॅनेल आहे.
त्यावर त्यांचे जवळपास 90 लाख फॉलोअर्स आहेत. अलीकडे योस हॉफमन यांना चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट पोस्ट केल्याबद्दल तुरूंगात शिक्षा सुनावण्यात आली आहे. वास्तविक, योस हॉफमनने आपल्या चॅनेलवर 16 वर्षाच्या मुलीचा बलात्काराचा व्हिडिओ शेअर केला होता.
14 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा :- YouTube वर अशी विवादास्पद सामग्री शेयर करण्यास सक्त मनाई आहे. हा चाइल्ड रेप व्हिडिओ 2018 चा आहे आणि पीडिताची बदनामी करण्यासाठी योसने हा शेअर केल्याचा आरोप आहे.
अशा परिस्थितीत आता योसला अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चाइल्ड पोर्नोग्राफीचा आरोप सिद्ध झाल्यास 14 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.
योस ला आहे न्याय मिळण्याची आशा :- योस हॉफमन स्वत: साठी न्यायाची अपेक्षा करीत आहे. ती म्हणते की फक्त व्हिडिओ पोस्ट केल्याने ती दोषी होणार नाही. परंतु YouTube त्याच्या पॉलिसी बद्दल सख्त आहे आणि अशा परिस्थितीत योस चे वाचणे अवघड आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम