शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्राच्या कंपनीतून दिला राजीनामा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

पॉर्न फिल्म्स आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलिसांच्या रडारवर आली आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याची झाडाझडती घेतली. तसेच शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राचे ऍडल्ट ऍप हॉटशॉट्‌स आणि त्यातील कटेंटविषयीची पूर्ण माहिती शिल्पाला होती.

या ऍपमधून होणाऱ्या कमाईमधील मोठी रक्कम अनेकदा शिल्पाच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती असे मानले जाते आहे. त्यामुळे शिल्पाही आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात शिल्पाचा किती सहभाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेची टीम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सोबतच शिल्पाला कंपनीच्या पैशांचा काही फायदा झाला का, याची चौकशीही गुन्हे शाखेची टीम करीत आहे. शिल्पाच्या बॅंक खात्यांची चौकशीही गुन्हे शाखेकडून केली जात आहे.

या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टीने ‘वियान इंडस्ट्रीज’च्या डायरेक्‍टर पदावर किती दिवस काम केले याचा शोध घेण्याचा प्रयत्नही गुन्हे शाखा करत आहे. चौकशीसाठी पोलिस पुन्हा शिल्पाशी संपर्क साधू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe