भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, भिंगार कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, विशाल बेलपवार, अर्जुन बेरड, दिलीप ठोकळ, संपत बेरड, सदाशिव मांढरे, मच्छिंद्र बेरड, दिपक बडदे, गणेश शिंदे, शरद पतंगे,

सतीश सपकाळ, बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब राठोड, अस्लम शेख, प्रकाश शेलार, अथर्व सपकाळ, मतीन ठाकरे, सर्वेश सपकाळ, फैय्याज शेख, बापू बेरड आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केले.

परस्त्रीला माते समान वागणुक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. शेतकर्‍यांना त्यांनी न्याय देण्याचे कार्य केले. आज त्यांच्या विचारांची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe