अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- “शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे.
असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील.
अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की, शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्यं केलंल आहे.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं.
नाशिकमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय राऊत म्हणाले, “ आमच्या कुणाचाही मनात संभ्रम नाही.
पण प्रसिद्धी माध्यमांमुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून आणि मी त्या प्रक्रियेतील एक घटक होतो, अनेक गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत,
मी साक्षीदार होतो म्हणून मी आपल्याला सांगतो की या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील. त्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही.”
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम