अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवसापासून शिवसेनेचे गीत डायलर टोन म्हणून टेलिकॉम कंपन्यांना अनिवार्य करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी दिले.
यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, युवा सेनेचे विक्रम राठोड, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. मराठी गायक अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलेले शिवसेना गीत महाराष्ट्रातील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डायलर टोन म्हणून अनिवार्य केल्यास शिवसैनिक हे डायलर टोन आपल्या मोबाईलवर लावू शकतात.
या गीताच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात स्फुर्ती व अभिमान जागणार आहे. तर शिवसैनिक असल्याची ओळख देखील एकप्रकारे निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिवसैनिकांच्या मागणींचा विचार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवसापासून शिवसेनेचे गीत डायलर टोन म्हणून टेलिकॉम कंपन्यांना अनिवार्य करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी दिले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved