अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- मुळा – मुलीचे लग्न वयोमर्यदा निश्चित करण्यात आले असताना देखील आजही अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींचे विवाह केले जात असल्याच्या घटना घडत आहे. यातच एक धक्कादायक प्रकार शेवगाव तालुक्यात घडला आहे.
मुलीच्या आईने १३ वर्षीय मुलीचे लग्न एका ३० वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिले असून, याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे, अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बीड जिल्ह्यातील बावी येथील एका तेरा वर्षीय मुलीचा तिच्या आईने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील एका वस्तीवरील तीसवर्षीय व्यक्तीसोबत १८ ऑगस्ट रोजी विवाह निश्चित केला होता. त्या मुलीचे आई-वडील गेल्या काही वर्षांपासून विभक्त झाले आहेत. मुलीचा सांभाळ आई करीत आहे.
लहानग्या मुलीचा तिच्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलासमवेत विवाह लावला जाणार असल्याची कुणकुण तिच्या वडिलांना लागली. त्यांनी हा प्रकार नगर येथील चाइल्ड लाइनच्या सदस्यांच्या निदर्शनास आणून दिला.
मात्र, ठरलेल्या तारखेअगोदरच अज्ञातस्थळी मुलीचा गुपचूप विवाह लावून देण्यात आला, असे मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यानंतर कदम यांनी शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला.
याप्रकरणी झीरो नंबरने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मात्र, त्यांनी नकार दिला, असेही त्यांनी सांगितले. घटना आपल्या हद्दीत घडली नाही, झीरो नंबरनेही गुन्हा दाखल करून घेता येणार नाही, असे पाटील म्हणाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम