अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना ठाण्यामध्ये एकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ आरोपीला पाथर्डी तालुक्यातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणारे हे कुटुंब आहे.
काही दिवसापूर्वी त्या अल्पवयीन मुलीची आई ही बाहेरून आणलेले कपडे देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे जात असतानाच त्या वेळेला पाथर्डी येथील राहणारा तिचा नातेवाईक हा घरी आला व त्याने सहज भेटण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.
त्याच वेळेला फिर्यादीने मी आणलेले कपडे घेऊन येते असे संबंधित व्यक्तीला सांगून सदर अल्पवयीन मुलीची आई ही तिच्या लहान मुलासमवेत बाहेर गेल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी ही एकटी होती. त्याच वेळी आलेल्या त्या नातेवाईकाने त्या अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक अश्लील वर्तन केले.
आई घरी आल्यावर ती अल्पवयीन मुलगी घरामध्ये रडत बसलेली दिसून आली. घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली. त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने आज तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम