धक्कादायक ! जागेच्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला; सात जण गंभीर जखमी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- सोनई ते घोडेगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या वसाहतीत जागेच्या वादातून दोन कुटूंबांत कुर्‍हाड व काठ्यांनी हाणामारीची घटना घडली आहे. धक्कादायकबाब म्हणजे यावेळी एका गटाने अ‍ॅसिडचा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

अ‍ॅसिड हल्ल्यात चौघे तर एकूण 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सोनई ते घोडेगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या वसाहतीत मोकळ्या जागेच्या वादातून दोन कुटुंबात काठ्या, कुर्‍हाडीने मारहाण करण्यात आली.

एका गटाने अ‍ॅसीडचा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार संगिता गिरी करत आहेत. पहिली फिर्याद… पहिली फिर्याद शोभा कैलास अनारसे यांनी दिली.

फिर्यादीत म्हटले की, जागेच्या वादातून काठी व कुर्‍हाडीने पती कैलास यांना तोंड व खांद्यावर मारले यात ते गंभीर जखमी झाले आहेत. यावरून सीताराम रंगनाथ रौंदळ, सुधा सीताराम रौंदळ, स्नेहल सीताराम रौंदळ, राजेंद्र मारुती अनारसे, संगिता राजेंद्र अनारसे व अमृता राजेंद्र अनारसे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद… दुसरी फिर्याद सुधा सीताराम रौंदळ यांनी दिली असून त्यात म्हटले की, आरोपी कैलास अनारसे यांनी घरातून आणलेल्या अ‍ॅसीडचा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरुन कैलास अनारसे, शोभा अनारसे, दिपक अनारसे व वैष्णवी अनारसे या चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe