अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-मुलगा सतत दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देतो या कारणावरून वडिलांसह तिघांनी संगनमत करून मुलास लाकङी दांङक्याने जबर मारहाण करून जिवे ठार मारले.
ही धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील न .पा वाडी शिवारात घडली. याबाबत राहाता पोलिसांनी मयत मुलाच्या आई वडिलांसह ४ जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोक धनवटे हा घरातील लोकांना दारू पिऊन त्रास देतो या कारणावरून जन्मदात्या आई वडीलंनी आपल्या मुलाला मारहाण करत जीवे ठार केले आहे .
याप्रकरणी गावच्या पोलीस पाटील योगीता प्रताप धनवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मयताचे वडिल गोपीनाथ बाबुराव धनवटे,
आई कमल गोपीनाथ धनवटे (रा. न. पा. वाडी) चुलत भाऊ धनंजय बाबासाहेब धनवटे (रा. पिंप्रीनिर्मळ) व आत्याचा मुलगा सागर साहेबराव खरात (रा. निमगाव, राहाता) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.यावरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|