अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर बाधितांची आणि मृत्यूची भर पडते आहे. यातच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकतेच कोरोनाचा संसर्ग झाल्याने एक दिवशी तीन आमदारांचा मृत्यु झाला आहे. मृत पावलेल्या तीन आमदारांमध्ये भाजपचे आमदार सुरेश श्रीवास्तव, रमेशचंद्र दिवाकर आणि काँग्रेस आमदार कलावती भूरिया हे आहेत.
दरम्यान भाजपचे सुरेश श्रीवास्तव हेलखनऊमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होेते. त्यांचं शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर पीजीआयमध्ये उपचार सुरू होते.
तर दुसरे औरैया जिल्ह्यातील भाजपचे आमदार रमेशचंद्र दिवाकर यांनाही कोरोनाची लागण झाल्यावर खासगी दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं.
दरम्यान, तिसऱ्या मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार कलावती भूरिया यांनाही कोरोनाची लागण झाल्यावर इंदूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यांचे भाऊ आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विक्रांत भूरिया यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|