धक्कादायक ! ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-पाण्याच्या टाकीसाठी घेतलेल्या खड्ड्यात डंपरने माती टाकत असताना अचानक डंपरचे फाळके निघून डंपरमधील माती अंगावर पडून घुलेवाडी येथील एका तरुणाचा जागीच मृत्यु झाला.

ही घटना संगमनेर तालुक्यातील पिंपळे शिवारातील वटमाईच्या डोंगराजवळ असणाऱ्या खडी कृषरजवळ घडली. दरम्यान या दुर्दैवी घटनेत किरण मच्छिंद राउत (वय ३५ रा. घुलेवाडी) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण राउत हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा बांधकाम व्यवसाय होता. पिंपळे येथे एका पाण्याच्या टाकीचे काम सुरु असताना त्यासाठी घेतलेल्या खड्ड्यात डंपरमधून माती टाकली जात होती.

डंपरचे फाळके किरण राउत उघडत असताना अचानक ते सटकले आणि त्यांचा जोराचा झटका राउत यांना बसून खड्ड्यात पडले. वरून डंपरमधील माती त्यांच्या अंगावर पडल्याने दबून त्यांचा मृत्यू झाला. या निधनाने घुलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe