धक्कादायक ! दिवसाढवळ्या भर बाजारपेठेत त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना बाराजुल्ला भागात आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास घडली. दहशतवाद्यांनी शुक्रवारी श्रीनगरमधील बारजुल्ला परिसरात जवानांवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र दहशतवाद्याने पोलीस दलावर थेट गोळीबारांचा वर्षावच केल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

दोन्हीही शहीद जवान जम्मू-काश्मीर पोलीस दलात तैनात होते. या घटनेनंतर भागाला घेराव घालण्यात आलाय. तसंच सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही सापडलं आहे. या फुटेजमध्ये एक दहशतवादी एके – 47 घेऊन दबा धरून आहे. तो तेथील मुख्य बाजारातही शस्त्र घेऊन फिरताना दिसत आहे.

या दहशतवाद्याची ओळख पटवून त्याला शोधण्याची मोहीम राबवली जात आहे. या दहशतवाद्याच्या जोडीला अन्य एक दहशतवादीही दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर ते तिथून फरार झाल्याचंही फुटेजमध्ये दिसत आहे.

हे दोन्ही पोलीस कर्मचारी श्रीनगर विमानतळाला श्रीनगर शहराशी जोडण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी तैनात होते.हे दहशतवादी शेजारच्याच एका गल्लीतून आले आणि त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, असं सुरक्षा दलांचं म्हणणं आहे.

दरम्यान जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरादरा मोहीम हाती घेतली आहे. तसेच अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामुळे दहशतवादी संघटना अधिकच चवताळल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe