धक्कादायक ! तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे चार जणांनी एका तरुणावर चक्क कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संदीप राजेंद्र तांबे (वय 28 वर्षे, धंदा नोकरी, रा. तांबे वस्ती, तांभेरे ता. राहुरी) या तरुणाने फिर्याद दाखल केली आहे.

दाखल फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तांबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रतन रामदास तांबे, किशोर रतन तांबे, प्रवीण रतन तांबे, तेरेजा प्रवीण तांबे सर्व रा. तांबे वस्ती, तांभेरे ता. राहुरी.

यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपींनी संदीप तांबे यास म्हणाले कि, तुम्ही येथे राहायचे नाही. तुम्ही येथून निघून जा. त्यावेळी फिर्यादी तांबे हे त्यांना समजावून सांगत असताना

त्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी व त्यांचे आईला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी आरोपींनी कुर्‍हाडीच्या दांडक्याने फिर्यादी तांबे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच पायाला लाकडी दांड्याने मारहाण केली.

त्यावेळी तांबे यांची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe