अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यातच जगभरात अनेकांना कोरोनाची बाधा देखील झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यातच अनेक राजकीय नेते, उद्यीयोजक, खेळाडू आदींना देखील कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. मात्र नुकतेच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान यांचे विशेष सहाय्यक फैजल सुलतान यांनी याबाबत माहिती दिली.
धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. इम्रान खान सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
इमरान खान यांनी चीनने तयार केलेली सिनोवॅक ही लस घेतली होती. दरम्यान,पाकिस्तानमध्येही कोरोनानं हाहाकार माजवला आहे.
शनिवारी पाकस्तानमध्ये नवीन कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशातील नागरिकांना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची विनंती पाकिस्तान सरकारने केली आहे.
दरम्यान कोरोना लसीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून असून आता चीनची लस घेतल्यानंतरच खान यांना कोरोनाची लागण झाल्याने चीनची कोरोना लस सेफ आहे का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|