अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना एकतर्फी प्रेमातून मुलीला…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  प्रेमातून मुलीला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार नगर येथे घडला आहे ,एक तर्फी प्रेमातून मुलीला पळवून थेट तिला डांबून ठेवल्याची धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला असून

अकोला जिल्ह्यातील एका तरुणीला नगर शहरातील लाल टाकी येथे डांबून ठेवले असल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे .

या प्रकरणी समीर शेख अब्दुल समद यांच्याविरुद्ध तरुणीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे .माहीती अशी ,संबंधित तरुणी पुणे येथे एका खाजगी कंपनीत कंप्यूटर इंजिनियर म्हणून कामाला होती ,

29 मे रोजी संबंधित तरुणीने तिच्या आई सोबत बोलणे झाल्यानंतर तरुणीचा मित्र कमिल शेख अब्दुल समद याने तिला नगर येथे बोलावून लग्न करण्यासाठी आग्रह धरला असता

त्या मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यांनंतर त्याच्या तीन मित्रांच्या सहाय्याने नगर येथेत्या मुलीला डांबून ठेवले तसेच त्या मुलीला त्यांनी जबरदस्त त्रासही दिला विशेष म्हणजे या तीन जणांनी त्या मुलीचा फोटो काढून तिच्या आईच्या व्हाट्सअप वर तो फोटो टाकला,

त्यानंतर संबंधित तरुणीने आपल्या आईशी संपर्क केला असता मी अडचणीत आहे असे सांगितल्यावर तिच्या हातातून फोन काढून घेऊन तो बंद केला.

सदरची हकीगत तिच्या आईला कळल्यानंतर आईने नगर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळके हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe