अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- वडिलांनी मुलाच्या साहाय्याने त्यांच्याच गणेश नावाच्या मुलाला विषारी औषध देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद राहुरी पोलिस स्टेशनला दाखल झाली.
कोंढवड येथे नऊ जुलै रोजी हा प्रकार घडला. कोंढवड येथील गणेश बाळासाहेब म्हसे यांनी या बाबतची फिर्याद राहुरी पोलिसात दिली.
बाळासाहेब रावसाहेब म्हसे, ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे, रा. कोंढवड अशी आरोपींची नावे आहेत. ९ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास गणेश घरी अंथरुणावर झोपलेला असताना तेथे त्याचे वडील बाळासाहेब रावसाहेब म्हसे व भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे खोलीमध्ये आले.
गणेश यास तुझे दुखणे बरे आहे का, तू जेवण केले का, अशी विचारणा केली. तुझ्यासाठी औषध आणलेय तू ते पिऊन घे. मग तुला बरे वाटेल, असे म्हणाले.
गणेशने वडिलांच्या हातात घासावर फवारणी करण्याकरिता असणाऱ्या औषधाची बाटली पाहिली. त्यामुळे गणेशने ते औषध घेण्यास नकार दिला. परंतु लहान भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे याने गणेशला पाठीमागून दाबून धरले.
वडील बाळासाहेब म्हसे यांनी त्यांच्या हातातील घासावर फवारणीसाठी आणलेले औषध फिर्यादीचे तोंडात ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दाखल केली आहे.
अहमदनगर ब्रेकिंग : गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार
अहमदनगर सावधान : चांदबीबी महालावर जाण्याआधी ही बातमी वाचाच…
अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाची भीती दाखवत दरोडा !
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम