अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : ‘मूलबाळ होत नाही’ म्हणून पती व सासूने महिलेसोबत केल असे काही..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे राहत असलेल्या पत्नीला नातेवाइकांकडून लग्नात खर्च झालेले ५० हजार रुपये घेऊन ये, अशी मागणी करून पती व सासुने महिलेला (सून) बेदम मारहाण करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार पानकुरा भुसावळ जिल्हा जळगाव येथे घडला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी सदरचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील सविता हेमंत ठाकरे (२२, हल्ली रा. सोनेवाडी, तालुका कोपरगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

यात म्हटले, की भुसावळ येथे महिलेचे सासर आहे. पती हेमंत रमेश ठाकरे व सासू लताबाई रमेश ठाकरे (रा. पानकुरा, भुसावळ, जिल्हा जळगाव) यांनी ‘तुझ्या नातेवाईकांकडून लग्नाचा खर्च झालेले ५० हजार रुपये घेऊन ये, तुला मूलबाळ होत नाही,

स्वयंपाक येत नाही, घरात काम जमत नाही’, असे म्हणून नेहमी घालूनपाडून बोलून, लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून दुखापत केली, तसेच ९ एप्रिलला उलटनी गॅसवर तापवून माझ्या तोंडावर,

ओठावर, पोटावर चटके देत मला क्रूर वागणूक दिली. या फिर्यादीवरून पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार कुसारे यांनी भुसावळ तालुका पोलिस स्टेशन यांना गुन्हा वर्ग केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News