अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जगात ख्याती असलेले साई मंदिर कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेरीस उघडले आहे. अनेक दिवसानंतर मंदिर उघडल्यानंतर भाविक देखील दर्शनासाठी देशभरातून येत आहे.
यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख रित्या पार पाडली जात असते. मात्र कालच्या एका घटनेमुळे साई मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. शिर्डी येथील साईमंदिरावर विशिष्ट अंतरावरुन कोणतीही वस्तू उडवू नये असा नियम असतांना एका हेलिकॉप्टरने मंदीर कळसाला घिरट्या घातल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
घिरट्या घालणार्या चाँपरमध्ये कोण होते? याबाबत माहिती समजू शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर साईमंदीर परिसरात हजर होते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करुन यापुढे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असून या ठिकाणी देशविदेशातील लाखो भाविक येत असतात. बारा वर्षापूर्वी साईमंदिरावर हेलिकॉप्टर मधून काही भाविक पुष्पवृष्टी करायचे. मात्र साईमंदिराला सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकार बंद करून मंदिरावरुन अशाप्रकारे जवळून कोणत्याही प्रकारचे वस्तू उडवली जाऊ नये असा नियम करण्यात आला आहे.
तरीदेखील गुरुवारी निळ्या रंगाच्या हेलिकॉप्टरने साईमंदिराच्या सुर्वण कळसा जवळून फेरी मारल्याची घटना घडली. साईमंदिर हे आंतराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून येथे नेहमीच गर्दी होत असते. अशावेळी साईमंदिरावरुन गेलेल्या हेलिकॉप्टरची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved