अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. यातच दरदिवशी जिल्ह्यात, खून, हत्या यासारख्या धक्कादायक घटना घडू लागल्याचे दिसून येत आहे.
यामुळे पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडीस आली आहे.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकराची माहिती शेवगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
खुंटेफळ भागात रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तपास सुरू होता. या मुलाचा असा निर्घृण खून का केला ? कोणी केला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
याच सर्वांचे उत्तर तपासानंतरच उघडीस येणार आहे. मात्र या घटनेमुळे खुंटेफळ भागात खळबळ उडाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|