धक्कादायक : जिल्हा बँकेच्या संचालकाने कार्यकर्त्यांच्या मदतीने साडेचार लाख रूपये केले होते लंपास, आता होतेय ‘ही’ मागणी…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँक एका चोरीच्या प्रकरणाने पुन्हा चर्चेत आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शाखेतून साडेचार लाख रूपयांची रोकड गर्दीचा फायदा घेवून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

दहिगाव पतसंस्थेचे पदाधिकारी सुनील इंद्रभान कावरे यांनी गुरूवारी एका तक्रारपत्राद्वारे पोलीस अधिक्षकांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले आहे.

आपल्या पत्रात ते म्हणतात, आमची संस्था अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभासद आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या बेलवंडी शाखेतून ७ डिसेंबर रोजी गर्दीचा फायदा घेऊन बँकेच्या संचालकाने व त्याच्या कार्यकर्त्याने साडेचार लाख रुपयांच्या रकमेची चोरी केली असून त्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बँकेच्या सभासद संस्थेने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

साडेचार लाख रूपयांची रोकड गर्दीचा फायदा घेवून लाबंविण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. बँकेच्या एका संचालकाने कार्यकर्त्यांच्या मदतीने ही चोरी केली आणि हा प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये उघडकीस आल्याचे त्यात नमुद होते. मात्र याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही.बँकेच्या संचालकाने बँक प्रशासनावर दबाव आणून कार्यवाही होऊ दिलेली नाही, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बँकेला ही बाब शोभणारी नाही. आर्थिक संस्थेतून अशाप्रकारे दिवसाढवळ्या पैसे चोरी होत असतील तर लोकांचा बँकेवरील विश्वास उडेल. भ्रष्टाचार चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यास सभासद संस्थेचे नुकसान होईल. या घटनेची चौकशी करून संबंधियांवर गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

बँकेचा कर्मचारी फिर्याद देण्यास जात असल्याचा उल्लेख बातमीमध्ये आहे, मात्र अद्यापही गुन्हा दाखल नसून आरोपी संचालक व त्याचा कार्यकर्ता उजळ माथ्याने समाजात फिरत आहे.बँकेच्या सबंधित संचालकाने बँक प्रशासनावर दबाव आणून कायदेशीर कारवाई होऊ दिली नाही. ही बाब आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या व नावलौकिक पावलेल्या बँकेस शोभणारी नाही.

आर्थीक संस्थेतून संचालक अशा प्रकारे दिवसा ढवळ्या पैशांची चोरी करून घेऊन जात असतील तर बँकेवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार, चोऱ्यांचे प्रमाण वाढेल त्यातून सभासद संस्थांचे नुकसान होणार आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे.

जिल्हा बँकेच्या बेलवंडी शाखेत घडलेल्या या घटनेची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!