अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- महाविकासआघाडी सरकारच्या आग्रही मागणीनंतर केंद्र सरकारने गुरुवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना कोरोना लसींचे वाटप केले. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या ७,४०,००० लशी आल्या आहे.
तर लस वाटपात केंद्राने भाजपशासित राज्यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. यामुळे वादजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे.
त्यामुळे या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून भाष्य केले आहे.
त्यांनी या ट्विटमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक उपाय सुचवला आहे. नेमके काय म्हणाले पवार ट्विटमध्ये?
जाणून घ्या कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय.
त्यामुळे राज्याला एकत्रच 3-4 कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|