मनसेच्यावतीने चक्क घातले खड्ड्याचे श्राध्द!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर -जामखेड महामार्गावरील चिचोंडी पाटील शिवारात भातोडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पाटबंधारे विभागाचा मोठा खड्डा आहे.

या खड्ड्यामध्ये राजरोसपणे लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे मनसेच्या वतीने या खड्ड्याचे श्राद्ध घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने येथे अनेकदा अपघात घडले आहेत. रात्रीच्या वेळी हा खड्डडा लक्षात न आल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मृत्यूचा खड्डा बनत चालला आहे.

त्यामुळे मनसेच्या वतीने या खड्डयाचे श्राद्ध घालून गांधिगिरी आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसांमध्ये हा खड्डा न बुजवल्यास मनसेच्यावतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख संदीप काळे यांनी व्यक्त केले.

यावेळी मनसेचे अक्षय परकाळे, भारत कोकाटे ,जयसिंग दळवी, पंकज पंधारे, शंकर सरोदे, किसन कोहक, बाळासाहेब कांबळे ,आदी उपस्थित होते

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe