अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसाईबाबा संस्थांनमध्ये विश्वस्त मंडळाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून सात ते आठ दिवसांत शिर्डी साई संस्थानचे अधिकृत विश्वस्त मंडळ स्थापन होणार असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच राज्य सरकार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अतिशय महत्वाचं आणि मानाचं पद म्हणून संस्थानच्या विश्वस्तपदाची ख्याती आहे. म्हणून अनेकांनी मुंबईला आपआपल्या सोयीनुसार फिल्डिंग लावली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या
आदेशानुसार दोन आठवड्याची मुदत विश्वस्त मंडळ स्थापनेसाठी राज्य सरकारला दिली आहे. त्यानुसार विश्वस्त मंडळातील प्रत्येक सदस्याचे चारित्र्य तसेच शैक्षणिक पात्रता, अनुभव तसेच भक्तमंडळाचा सदस्य या बाबी तपासूनच अभ्यासपूर्वक निवडी केल्या जाणार आहे.
सध्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. येत्या दोन दिवसात त्याचा तिढा सुटणार आहे.करोड रुपयांची उलाढाल असणाऱ्या साई संस्थांनमध्ये या पदाला विशेष महत्व असून शिर्डी आणि पंचक्रोशीतून अनेक इच्छुकांची यादी समोर आली आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून संदीप वर्पे, संग्राम कोते, आमदार आशुतोष काळे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, सुधाकर शिंदे, निलेश कोते आदींची नावे चर्चेत आहेत तर शिवसेनेकडून रावसाहेब खेवरे, कमलाकर कोते, सचिन कोते, संजय शिंदे,
भारतीय कामगार सेनेचे ज्ञानदेव पवार, अनिता जगताप, राजेंद्र झावरे आदींची नावे चर्चेत आहेत,राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सत्यजीत तांबे, करण ससाणे, डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात यांची नावे चर्चेत आहेत.
मात्र, उच्च न्यायालयात याचिकाकर्ते यांनी केलेली मागणी आणि नियमावली याचे पूर्णपणे पालन हे राज्यसरकारला बंधनकारक असल्याने आता सात आठ दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम