अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत.
मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी दिला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन राज्यात सुरू झाले.

कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात आले. आता संभाजीराजे छत्रपतींनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती.
आपल्या मागण्यांबाबत चालढकल केली जात आहे याबाबतही संभाजीराजे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्या सहा मागण्या होत्या. त्याबाबत काही हालचाली होत आहेत. पण बाकीच्या मागण्यांबाबत अजून काही निर्णय झालेले नाहीत.
एमपीएससीच्या २१८५ तरुणांच्या मुलाखतीबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. अजित पवार यांना पुन्हा एकदा फोन करून विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले. सारथी संस्थेचे अध्यक्ष विजय निंबाळकर आणि संभाजीराजे यांची सारथी संस्थेबाबत चर्चा झाली.
सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तत्काळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













