त्या’ कारखान्याच्या वजनकाट्याच्या मापात पाप! शेतकऱ्यांनी केले आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यातील श्रीवृद्धेश्वर साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या मापात पाप असल्याचे सांगुन शेतकऱ्यांनी मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन केले.

सहा तास उसाचे वजन करणारा काटा बंद होता. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. वजनकाटा ही तांत्रीक बाब आहे.

त्याची खातरजमा करण्यासाठी संबंधित विभागाकडुन चौकशी करता येईल. मात्र कोणी दोषी आहे असे सांगता येणार नाही असे नेवसे यांनी सांगितले.

श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर पहाटे वजन केलेल्या एका टायर बैलगाडीच्या मोजमापावरुन वाद सुरु झाला होता. उसाचा मालक व कारखाना व्यवस्थापन यांच्यात यावरुन मतभेद झाले.

माझ्या बैलगाडीचे वजन चार टनापेक्षा कमी भरत नाही, मग सहाशे किलो वजन कमी भरले तर वजनकाट्याची तपासणी करावी. अशी मागणी साहेबराव पवार या शेतकऱ्याने केली.

त्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी वजनकाटा बंद पाडला. पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत वजन करणारा काटा बंद राहीला.

नायब तहसीलदार पंकज नेवसे व प्रभारी कार्यकारी संचालक रविंद्र महाजन आंदोलनस्थळी येत त्यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe