अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- साहेब उपचारा अभावी कोपरगावचे नागरिक मरत आहेत त्यांना जाळण्यासाठी किमान लाकडे तरी द्या. आता अंतिमसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासू लागली आहे.
जाळण्यासाठी लाकडांची मदत करा अन्यथा आम्हाला विष तरी द्या म्हणजे कोरोनाने बेहाल होवून मरण्यापेक्षा तुमच्या मदतीच्या विषाने मेलेले बरे
अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी खासदार सदाशिव लाेखंडे यांच्याकडे केली.
कोरोना संकटाच्या काळात नागरिकांनी रुग्णवाहिका मागितली तरी खासदार लाेखंडे यांनी दिली नाही.
सध्या कोरोनाने उद्रेक केला. उपचार घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत,ऑक्सिजन चा पुरवठा अपुरा पडतोय, उपचारा अभावी माणसांचा मृत्यु होत असल्याने
वैतागलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कृष्णाई मंगल कार्यालयाबाहेर खासदार लोखंडे यांना घेराव घालून मदत करण्याची विनंती केली.
खासदार यांनी उडवाउडवीचे उत्तर देताच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी खासदार लोखंडे यांचे खाली वाकून पाय धरत म्हणाले,
जाळण्यासाठी लाकडांची मदत करा अन्यथा आम्हाला विष तरी द्या म्हणजे कोरोनाने बेहाल होवून मरण्यापेक्षा तुमच्या मदतीच्या विषाने मेलेले बरे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे आल्या त्यांनीही खासदार लोखंडे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडून नागरिकांना या संकटकाळात आरोग्यहितासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. व्याकुळतेने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीने उपस्थित सर्वजन गोंधळून गेले.
दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव येथे करोना आढावा बैठक घेतली या बैठकीला खासदार लोखंडे आले होते.
बैठक संपल्या नंतर ते बाहेर आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपली कैफियत लोखंडे यांच्यासमोर मांडली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|