अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- संगमनेर, शिर्डीसह श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून आलेल्या काही जणांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातून सहा जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
या सहा जणांवर वाळू चोरी, विनयभंग, दुखापत करणे, शिवीगाळ करणे आदी गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हा अधीक्षकांनी या तीन आरोपींना नगर जिल्ह्यातून १५ महिन्यांकरिता हद्दपार केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर पोलीस ठाण्याकडून जिल्हा अधीक्षकांकडे आलेल्या
प्रस्तावात आरोपी शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे (वय ३८, रा. धांदरफळ, ता. संगमनेर), अजय रावसाहेब निळे (वय २०, कौठे धांदरफळ) व विशाल पोपट निळे (रा. कौठे धांदरफळ, ता. संगमनेर) यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय शिर्डी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार आरोपी नितीन अण्णा धीवर (वय ३२, भीम नगर, शिर्डी), सचिन सीताराम गायकवाड (वय ३२, शिर्डी) यांना १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले.
त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावात आकाश दिनकर सौदागर (वय २०, रा. बोरावके काॅलेजजवळ, श्रीरामपूर) याच्यावर बळजबरीने चोरी करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. त्यानुसार सौदागर यास २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम