पेशंटला गळा दाबून मारता…रुग्णाच्या नातेवाईकाकडून सिव्हील सर्जनला शिवीगाळ

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-सिव्हील हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना रुग्णांना जावू दिले जाते. त्यांच्या नातेवाईकांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसे आदेश एसपी मनोज पाटील यांनी काढलेले आहेत. नातेवाईक रुग्णाला भेटू दिले जात नाही. या कारणावरून गेटवर एका रुग्णांच्या नातेवाईकाने सिव्हील सर्जनला शिवीगाळ केली.

दरम्यान हा सर्व प्रकार सुरु असताना अखेर सिव्हिलचे कर्मचारी संबंधित नातेवाईकाला समजावून सांगत असताना त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि काल सोमवारी सायंकाळी उजागरे, मरकड यांनी सिव्हील सर्जन सुनील पोखरणा व सतर अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळ केली.

तुम्हाला माझे काय करायचे ते करा, आमची अडवणूक का करतात, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुम्ही पेशंटचा गळा दाबून त्यांना मरतात. तुम्ही मला लेखी द्या, इथून पुढे मूत्यू झाल्यास त्याचे जबाबदार तुमचे हॉस्पिटल राहील, अशी अरेरावी केली. 

बैद यांच्यासोबत असलेल्या जाधव नावाच्या महिला कर्मचार्‍यांनाही शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार संदीप केरूळकर हे पुढील करत आहे.

सिव्हील हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागातील कर्मचारी सचिन शाम बैद यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.त्यानुसार चंद्रकांत आनंद उजागरे (रा. मिशन कंपाऊड, कोठी) आणि संदीप उत्तम मरकड (रा. मिरी, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe