Smartphone Information: स्मार्टफोनच्या खाली का असते बारीक छिद्र? काय आहे त्याचे महत्त्व? वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:

सध्याचे युग हे स्मार्टफोन आणि इंटरनेटचे युग आहे. काही हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेले स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये हे वेगवेगळे असते. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे वैशिष्ट्ये देण्यात आलेले असतात. त्यातील बरेच फीचर्स आणि त्यांचे कार्य आपल्याला माहिती नसते.तसेच स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे एप्लीकेशन देखील असतात. त्या एप्लीकेशनचे  वेगवेगळे प्रकारचे उपयोग वापरकर्त्याला होत असतात. स्मार्टफोन तयार करताना त्यामध्ये अशा अनेक बारीक-सारीक बाबी असतात ज्या खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि कामाच्या असतात.

परंतु त्यांचे महत्त्व आपल्याला माहितीच नसते. याच अनुषंगाने जर आपण स्मार्टफोनच्या सर्वात खाली चार्जिंग सॉकेट अर्थात चार्जिंग होलच्या जवळ असलेल्या एका बारीक आणि छोट्याशा होलचा विचार केला तर दिसायला खूप लहान असते परंतु त्याचा उपयोग पाहिला तर तो खूप मोठा आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचे महत्त्व काय आहे? हे माहिती नसेल. त्यामुळे आपण या लेखांमध्ये या बारीक असलेल्या होलचे महत्व जाणून घेणार आहोत.

 स्मार्टफोनच्या खाली असलेल्या बारीक होलचे महत्व

आपल्याला माहित असेलच की स्मार्टफोनच्या सर्वात खाली चार्जिंग सॉकेट जवळ एक अगदी लहान असे होल असते. बहुतांशी हे फोनच्या खालच्या बाजूला चार्जिंग कनेक्शनच्या अगदी शेजारी असते. परंतु आपल्याला बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल की त्याचे महत्त्व किती अनन्यसाधारण असे आहे. परंतु जर आपण स्मार्टफोनच्या एकंदरीत वापराचा विचार केला तर  या छोट्याशा होलचे महत्व स्मार्टफोनच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याचदा आपण ट्रॅफिक मध्ये असताना फोनवर बोलतो. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचा आवाज मोठ्याने सुरू असतो.

परंतु तरी देखील आजूबाजूचा आवाज पलीकडच्या आपण ज्याच्याशी बोलतो त्याला ऐकू न येता फक्त आपलाच आवाज व्यवस्थित त्याला ऐकायला येतो. असे कसे घडते याचा विचार आपण कधी केला आहे का? या दृष्टिकोनातून या छोट्या होलचे महत्त्व आहे. जेव्हा आपण अशावेळी फोनवर बोलत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला असा आवाज थांबवण्याचे महत्त्वाचे काम या होलच्या माध्यमातून पार पाडले जाते. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा बराच गोंधळ आजूबाजूला असतो. परंतु आजूबाजूला कितीही आवाज असला तरी समोरील व्यक्तीला फक्त आपलाच आवाज ऐकू येतो हे फक्त या छोट्याशा होल मुळे शक्य होते.

या छोट्या होलला नॉईज कॅन्सलेशन मायक्रोफोन असे देखील म्हटले जाते. जेव्हा आपण फोनवर बोलायला सुरुवात करतो तेव्हा तो स्वयंचलित पद्धतीने कार्यरत होतो. त्यामुळे तुम्ही कितीही गजबजाट आणि गोंधळ असलेल्या ठिकाणी असला तरी देखील या व्हॉइस कॅन्सलेशन मायक्रोफोन मुळे फोनवर बोलत असताना आजूबाजूचा कितीही मोठा आवाज राहिला तरी तो कॅन्सल होतो व तुमचाच आवाज फक्त समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. अशा पद्धतीने स्मार्टफोनच्या खाली असलेल्या या छोट्या होलचे कार्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe