अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- पावसाळा सुरु झाला कि आजरांना देखील सुरुवात होतच असते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हिवताप विभागाने जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणूनच जाहीर केला आहे.
या अंतर्गत प्रत्येक गावात १० टक्के घरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत. त्यानुसार सध्या सर्वेक्षण सुरू असून, उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात जुलै महिन्यात प्रत्येक तालुक्यात डेंग्यूबाबत सर्वेक्षण,
तपासणी व चाचण्या सुरू आहेत. सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत एकही डेंग्यूचा रुग्ण आढळून आलेला नाही. जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून प्रशासन जिल्ह्यात उपाययोजना करीत आहे,
तसेच नागरिकांमध्येही चांगली जागृती असल्याने एकही डेंग्यूचा रुग्ण आढळून आला नाही. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी दिली आहे.
या उपाययोजना सुरू आहेत –
- रुग्ण आढळून आल्यास टेमीफॉस या अळीनाशकाची फवारणी
- रुग्णालयाच्या ठिकाणी औषधे उपलब्ध
- सर्व ताप रुग्णांची तपासणी व उपचार मोफत
- ताप रुग्णास त्वरित औषधोपचाराची सोय
- विषाणूजन्य ताप असल्याने प्रतिबंधासाठी कोणतीही लस नाही
- औषधोपचारासाठी विशिष्ट औषध उपलब्ध नाही
- तापनिवारक, वेदनाशामक औषधे वापरता येतील
- उपचार म्हणून सलाईन, प्रतिजैवके घेऊ नयेत
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम