तर कर्ज कसे फेडायचे ? नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचा सवाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने श्रीरामपूर शहरात दुकानांच्या वेळा व इतर बाबींबाबत अनेक अटी व नियम लागू केले. ५ ते ६ दिवसांपासून शहरातील अनेक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आली.

दुकानांच्या वेळा कमी केल्या असल्या तरी व्यापारी बांधव प्रशासनास सहकार्य करत आहे. दुकाने सील करण्यापूर्वी दुकानदारांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे.

दुकाने सील राहिली तर व्यापाऱ्यांनी बँकेचे हप्ते कसे भरायचे, असा सवाल श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केला. कोरोनाचे नियम मोडून दुकाने सुरू ठेवल्याबद्दल पोलिस प्रशासनाने कारवाई केली.

या कारवाई विरोधात नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सोमवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी,

जिल्हा कार्याध्यक्ष अल्तमश पटेल, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस जयश्री जगताप, शहराध्यक्ष अर्चना पानसरे, नगरसेवक राजेंद्र पवार,

रवी पाटील, ताराचंद रणदिवे, प्रकाश ढोकणे, वैशाली चव्हाण, दीपक बाळासाहेब चव्हाण, दीपक चरण चव्हाण, भाऊसाहेब डोळस, रईस जहागीरदार, कलीम कुरेशी, शफीक शहा,

सुभाष पोटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे, राजेंद्र पानसरे, गौतम उपाध्ये, फारूक मुसानी, सोमनाथ गांगड, युसुफ लखानी, तौफिक शेख, जयंत चौधरी, हंसराज आदिक, अप्पा आदिक यांनी उपोषण केले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी निवेदन स्वीकारले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe