तर पारनेरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्वाना हेलावून सोडले. देवरे यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये.

मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा प्रस्ताव देत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या ऑडिओ क्लिपची चौकशी करा आणि दोषी लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनात केली. तसेच लोकप्रतिनिधींच्या त्रास सहन होत नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली.

आत्महत्येचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पारनेर तालुक्यात एक महिला तहसीलदार अधिकारी सुरक्षित नसेल, तर पारनेरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने अनेक पारनेर तालुक्यातील खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झालेले आहेत.

त्यामुळे एक महिला अधिकारी तहसीलदार अशाप्रकारे आत्महत्येचा इशारा देत असेल, तर यापेक्षा गांभीर्य परिस्थिती अजून तालुक्यात काय असू शकते. त्यामुळे ज्योती देवरे यांचा जबाब नोंदवून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. मनसे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देवरे यांना दिला.

जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हासचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले आदींनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe