अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाने अनेकांचा बळी घेतला असून, आता त्यावर अनेकानी मात केली आहे. तसेच गावे कोरोनामुक्त झाले आहेत तर अनेकांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.
नगर तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून ११० गावांपैकी ८२ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तालुक्यात आजपर्यंत १५५६८ नागरीक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
४०२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे तर चालुस्थितीत ६३ सक्रिय रुग्ण आहेत. जेऊर आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक मृत्यू १०६ झाले तर देवगाव आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात कमी १४ मृत्यू झाले आहेत.
मार्च – एप्रिल महिन्यात तालुक्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले होते. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूदरही चिंताजनक होता.
सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आला असून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम