अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला आहे. तसेच नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्याच कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान सोमवारी १०४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ७४ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १०९१ जणांवर शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधित आढळले.
त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३, नगर ग्रामीण २, पारनेर ७, पाथर्डी ६, संगमनेर १, श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात १५, अकोले १, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १०, नेवासा १, पारनेर ८, राहाता ७, संगमनेर ६, शेवगाव ३, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळून आले. नगर शहर २, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १, नेवासा ४, राहाता ५ आणि श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सोमवारी ७४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ८३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९८ टक्के इतके झाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved