अहमदनगर जिल्ह्यातील इतके शेतकरी झाले थकबाकीमुक्त !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

या अिभयानांतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३ हजार ७२० शेतकऱ्यांनी ६४ कोटी ६४ लाख रुपयांचा वीज बिलाचा भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद वाढत आहे.

या योजनेंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडील सुमारे १५ हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे पाऊल उचलले आहे. यात अहमदनगर मंडलात ३ लाख ९६ हजार कृषीपंप ग्राहकांकडे ५ हजार कोटी २८ लाखांची थकबाकी आहे.

ही योजना तीन वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

या योजनेत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख ३ हजार ७२० शेतकऱ्यांनी ६४ कोटी ६४ लाख रुपयांचा वीज बिलाचा भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe