जिल्ह्यात एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात देखील लसीकरणालाच श्रीगणेशा करण्यात आला आहे.

४५ ते ६० वर्षे आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना करोना लस देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर या मोहिमेस जिल्ह्यात हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे.

गुरूवारअखेर शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ४५ ते ६० वर्षे आणि ६० वर्षापेक्षा अधिक वय असणार्‍या १ हजार ३३३ ज्येष्ठांनी लस घेतली. दुसरीकडे खासगी रूग्णालयांमध्ये लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दररोज १०० प्रमाणे डोसची मागणी पैसे भरून नोंदवली आहे.

काल जिल्ह्यातील २० खासगी रुग्णालयात करोना लस देण्यात आली. जिल्ह्यातील 14 ग्रामीण रूग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात ६० वर्षांवरील एकूण आणि ४५ ते ६० वर्षे व्याधी असणार्‍या १ हजार ३३३ जणांनी लस घेतली. यात गुरूवारी २१९ हे ६० वर्षापेक्षा जास्त वय असणारे असून ३८ हे ४५ वर्षे असणारे आहेत.

लसीकरण मोहिमेस आता गती येत असून लस घेणारांचाही प्रतिसाद वाढत आहे. सध्या जिल्हा रूग्णालय, २ उपजिल्हा रूग्णालये, ११ ग्रामीण रूग्णालये, तसेच मनपाच्या आठ रूग्णालयांत मोफत लस उपलब्ध आहे. कोवीन डॉट जीओव्ही डॅाट ईन या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर संबंधिताला जवळच्या केंद्रावर लस उपलब्ध होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe