नियम मोडणाऱ्यांकडून तब्बल ‘इतका’ दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कोरोना प्रतिबंधात्मक निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ नागरिकांसह दुकानांवर मनपाच्या दक्षता पथकाने कारवाई करून ५२ हजार ६०० रुपये वसूल केले.

महानगरपालिका कोरोना दक्षता पथक क्रमांक १ ते ४ आणि दक्षता पथक शहर यांच्यावतीने तीन दिवसात विनामास्क १३८ नागरिक व तीन दुकानांवर ही कारवाई केली.

शहरातील मुख्य बाजारपेठ, सावेडी परिसर, रेल्वे स्टेशन, तेलीखुंट, दाळमंडई,कापड बाजार आदी भागात कारवाई सुरू आहे. कारवाईत पथक प्रमुख शशिकांत नजान, राकेश कोतकर, नंदकुमार नेमाणे, सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, राजेश आनंद,

अमोल लहारे, अनिल आढाव, भास्कर आकुबत्तीन, रवींद्र सोनावणे, सहाय्यक आयुक्त दिनेश सिणारे, यंत्र अभियंता परिमल निकम,

प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर आदींचे पथक ही कारवाई करत आहे. कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने पथकांनी दंडात्मक कारवाईला गती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe