अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा वापर केला असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास त्यांना दोन महिने कैदेची शिक्षा होऊ शकते.
दुय्यम कारागृहात मोबाइलचा वापर केल्याचा गुन्हा दाखल असल्याने बोठेला रेखा जरे प्रकरणात जामीन मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.
२५ जातेगाव येथील निवृत्त जवानाच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेला सौरभ पोटघन व कुरूंद ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून विरोधी उमेदवाराची हत्या करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अविनाश कर्डिले या दोन आरोपींकडे मोबाइल सापडले होते.
आरोपींनी हे मोबाइल कैद्यांना जेवण पुरवणारे सुभाष लोंढे व प्रविण देशमुख यांनी आणून दिल्याचे कबूल केले होते.
सौरभ पोटघन, अविनाश कर्डिले व बोठेसह त्याच कोठडीत असलेल्या इतर तिघांनी मोबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम